हतनूर धरणगात मुलबल पाण्याचा साठा; पाणीटंचाईची समस्या अद्याप नाहीच

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यासह राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असताना मात्र हतनूर धरणातील पाणीसाठा मात्र समाधान कारक असून अद्याप टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झालेली नाही. विदर्भात झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णा नदीला आलेल्या पाण्यामुळे हतनूरच्या पाण्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

 

सुमारे अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या हातनुर धरणातील पाण्यावर रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ परिसरातील शेतीचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणी तसेच दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प व भुसावळ रेल्वे परिसर सुद्धा हातनुर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतो. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 388 दश लक्ष घनमीटर असून धरण पूर्ण भरल्यास त्याच्या पाणी पातळीची उंची ही 214 मीटर असते. धरणाला एकूण 41 गेट असून एका गेटची उंची 6.5 मीटर व लांबी 12 मीटर आहे. सन 2018 मध्ये पाणी पातळीची उंची ही 207.500 मीटर एवढी खाली आली होती. हि टंचाईची शेवटची पायरी असून याला ओगी लेव्हल म्हटले जाते. मागील वर्षी आजच्या दिवशी पाणी पातळीची उंची 211.290 मीटर होती व पाणीसाठा 247.600 दशलक्ष घनमीटर होता. यावर्षी आज पाणी पातळीची उंची 211.805 मीटर आहे व पाणी साठा 271.250 दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजेच मागील वर्षी पेक्षा 23.65 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा यंदा जास्त शिल्लक असून त्यापैकी उपयुक्त पाणी साठा सुमारे 55% आहे. त्यामुळे अद्याप तरी पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

वाढत्या तापमानामुळे धरणातुन बाष्पीभवन वाढले

मध्यंतरी विदर्भात अवकाळी पाऊस झाल्यामुळे पुर्णा नदीला पाणी आले यामुळे हतणुर धरणामध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले त्यामुळे धरणाची लेव्हल आहे तेवढीच आहे. मागील काही दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणातुन पाण्याचे बाष्पीभवन देखिल वाढले असल्याची माहिती हतणुर शाखा अभियंता तथा उपविभागीय अभियंता एस.जी. चौधरी यांनी दिली आहे.

Protected Content