Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ग्रामीण रूग्णालयात हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु शेख अलाउद्दीन, सैय्यद मुख्तार अली यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.

 

दर वर्षी मुस्लिम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे जातात जाण्यापूर्वी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे असते या शिबिरात एकुण २६ हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची ग्रामीण रुग्णालयात अल्प दरात सी बी सी, ब्लड शुगर, एक्सरे,के एफ टी व ई सी जी,असे चार पाच वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. संदिप जोशी सह आदि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version