Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हंबर्डी गावातील गावठी दारु विक्रीस पायबंद करा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हंबर्डी येथे विविध ठिकाणी अवैधरित्या सार्वजनिक ठीकाणी गावठी दारु विक्रेत्यांनी थैमान घातले असून, या दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून सदरील अवैध गावठी दारु विक्रीस प्रशासनाच्या वतीने कायमचे पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरु संत रविदास क्रांती मोर्चा यांच्या वतीने नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील हंबर्डी गावात व परिसरात सर्रासपणे विकली जाणारी अवैध हातभट्टीच्या गावठी दारु मध्ये मानवी जिवनास अत्यंत घातक असणारे विषारी रसायने मिसळवुन तयार केली जात आहे. गावठी दारू ही सहज स्वस्त किमतीत उपलब्ध होत असल्याने कष्टकरीवर्ग मजुरवर्ग तरूण याकडे आकर्षिला जात असुन त्यांचे आयुष्य व कुटुंबाचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध व्यवसायाकडे पोलीस प्रशासनाचे व दारुबंदी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भारदे व दारुबंदी विभागाचे जिल्हा अधिक्षक डॉ.भुकन यांना बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरु संत रविदास क्रांती मोर्चा जळगाव जिल्ह्यातर्फे सुमित्र अहिरे (राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा),देवाभाऊ निकम (जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),सुनिलभाऊ देहडे(शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),कुंदन तायडे(जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),राहुल सोनवणे (जिल्हा कोषाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा), पंकज तायडे(तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),शशिकांत सावकारे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा) आदिंच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत दोन्ही सन्माननीय अधिका-यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे क्रांती मोर्च्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.सदरील अवैध गावठी दारू विक्रीवर पायबंद न घातल्यास जिल्हा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरु संत रविदास क्रांती मोर्चा यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Exit mobile version