स्व. हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्‍त अभिवादन

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | स्व.हरीभाऊ जावळे इन्स्टीट्यूट ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्‍त  अभिवादन करण्यात आले.

 

स्व.हरीभाऊ जावळे इन्स्टीट्यूट ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे गुरुवार, दि. १६ जून रोजी हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य पुनित बस्सन, सहाय्यक प्राध्यापक रोहित अग्रवाल, प्रा.अपूर्वा मिश्रा यांनी स्व.हरीभाऊ जावळे यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण केले. यावेळी महाविद्यालयाचे अकाऊटंट मयुर माळी, क्‍लार्क चेतना भोळे, अनिता बारी, माया मगरे आदी उपस्थीत होते.

Protected Content