Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने महानगर भाजपातर्फे अभिवादन

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार, आमदार व माजी जिल्हा अध्यक्ष स्व हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरातर्फे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, चिटणीस प्रा.भगतसिंग निकम, नीला चौधरी, महिला अध्यक्षा दिप्ती चिरमाडे , जिल्हा महानगर सोशल मिडिया सहसंयोजक अक्षय चौधरी,कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष जयेश भावसार,व्यापार आघाडीचे अध्यक्ष अशोक राठी शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्रवीण जाधव,जयंत चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version