Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

यावल,  प्रतिनिधी ।  राज्याचे माजी कृषी व मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताच्या कृषी दिनानिमित्त यावल तालुक्यातील चौघा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

 

यावल तालुक्यातुन रब्बी हंगाम २o२oते २१ या वर्षातील राज्यस्तरीय पिक स्पर्धत तालुका पातळीवर एक आणि  जिल्हा पातळीवर तिन अशा शेतकरी या स्पर्धत सहभाग झाले होते. या शेतकरी बांधवांना  सन्मानपत्र मिळाले आहे . दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत २०२०ते २१च्या कालावधीत या पिक पेरणी प्रयोगातुन या स्पर्धात घेण्यात आल्या होत्या यात यावल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातुन तालुक्यातील एकुण २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती.  त्याचा  निकाल  जाहीर झाला असून  तालुका पातळीवर अनिल रामचंद्र महाजन (रा. कोळवद) तर जिल्हा पातळीवर यशवंत पुरुषोत्तम बऱ्हाटे ( रा. पाडळसा),  वैभव कालीदास महाजन (रा. कोळवद तालुका)व बापु कोळी (रा.अट्रावल)  यांची या स्पर्धचे विजयता म्हणुन निवड करण्यात आली आहे. यावेळी अनिल महाजन यांना यावल येथे पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्या हस्ते व पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव , पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी. कोते व पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांच्या उपस्थित तर यशवंतबऱ्हाटे , वैभव महाजन,  बापु कोळी या शेतकरी बांधवांना जळगाव येथे आयोजित जिल्हा परिषदच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभीजीत राऊत , जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी .एन. पाटील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्या हस्ते कृषी दिनाच्या कार्यक्रमात यांच्या हस्ते सन्मानपत्राने गौरविण्यात आले.

Exit mobile version