स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द; बुलढाण्याचे पालकमंत्री ना. शिंगणे यांची माहिती

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्याचे नेते तथा सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची ११ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर केलं आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा देखील हा 13 हजारापर गेला आहे. त्यामुळे दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले जिल्ह्याचे नेते सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्याकरिता आपण सर्वजण बुलढाणा येथील समाधीस्थळी मोठ्या संख्येने एकत्रित येत असतो. यामध्ये प्रामुख्याने मातृतिर्थ सिंदखेडराजा व खामगाव येथून स्मृतीज्योत येत असते. सिंदखेडराजा व खामगाव वरून स्मृती ज्योत येत असतांना ठीक ठिकाणी साहेब प्रेमी स्मृति ज्योतीचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पुण्यतिथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात येत आहे. तरी स्व. शिंगणे साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी आपल्या घरीच राहून स्वर्गीय साहेबांना आदरांजली अर्पण करावी, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तथा पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा. यांनी केले आहे.

Protected Content