Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व.पंडीतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

 

स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांचे सूपुत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव पाटील यांनी सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन लोक उपयोगी ठरणारी शवपेटी उंटावद तालुका यावलच्या विविध कार्यकारी सोसायटीला प्रदान केली. यावेळी सोसायटीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात या शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

 

उंटावदच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्येक्रमात विनोदकुमार पंडीतराव पाटील,सतिष पंडीतराव पाटील यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत(शशी आबा); गुलाबराव पाटील, उंटावद गावाचे प्रथम नागरिक सरपंच छोटु भगवान भिल, प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील, ग्रा.प.सदस्य डिगंबर धना सपकाळे, संचालक जगदीश  पाटील, मुरलीधर  पाटील, अरूण सोनवणे सचिव संजय दिनकर महाजन, साहेबराव पाटील, विकास पाटील, शांताराम पाटील, त्र्यंबक पाटील, अधिकराव पाटील, पुष्कराज पाटील, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version