Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्विस बँकांमध्ये भारतीयांची २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.

 

गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे.भारताच्या अर्थ  मंत्रालयाने स्विस बँकांमधील ठेवींमधील वाढ किंवा घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे.

 

मंत्रालयाने शनिवारी स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असल्याची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, शुक्रवारी असे अनेक अहवाल प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते ज्यात असे म्हटले आहे की सन २०२० अखेर स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांचे पैसे २०,७०० कोटी रुपयांवर गेले आहेत. २०१६ साली ही रक्क्म ६,६२५ कोटी होती. दोन वर्षांपासून घसरण होत असताना यावेळी स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांच्या पैशात वाढ झाली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गेल्या १३ वर्षातील ठेवींमधील ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचेही मीडियाच्या वृत्तांत म्हटले होते.

 

स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेली ही रक्कम काळा पैसा असल्याचे दर्शवत नाही. शिवाय, या आकडेवारीत अनिवासी भारतीय किंवा अन्य लोकांद्वारे तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावावर स्विस बँकांमध्ये पैसे असू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

 

Exit mobile version