Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वामी समर्थ विद्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वामी समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनोख्यापध्दतीने साजरा करण्यात आला.

जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांसारखा राजा घडवण्याचे कार्य या माऊलीने केले.या राजमाता जिजाऊचे कार्य व जीवनप्रवास आजच्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे परकियांच्या गुलामिततीनशे वर्ष जखडलेल्या मायभूमीला मुक्त करण्याचे काम जिजाऊनी केले. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, युध्दशास्त्र यामध्ये जिजाऊ पारंगत होत्या. मराठी, उर्दू,संस्कृत , पारशी, हिंदी या भाषा अवगत होत्या.रामायण व महाभारत कथा सांगितल्या नाही तर युद्धकला व राजनिती चे शिक्षण शिवबाने दिले. आंबेवाडी व पुनवडी हे घराणे त्याकाळी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य जिजाऊंनी केले. बी-बियाणे, बैल व नांगर देण्याचे (भूविकास) काम केले. वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्या या उपाध्यक्षांची किंमत मोजावी लागली. स्वामी समर्थ विद्यालयात घेण्यात प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार शपथविधी घेऊन व मुलींना जिजाऊचरित्रावर पुस्तके वाटण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अशोक लाड, वाय.एस.महाजन, स्वप्नील नेमाडे, राजेश गोयर, चंद्रकांत भंगाळे, माहेश्वरी, मिनाक्षी चव्हाण, उपाध्यक्ष कमल पाटील, सरचिटणीस ममता तडवी, जयश्री पाटील, जुलेखा, भैरवी पाटील, दिशा पाटील या मुलींनी जिजाऊचा वेश परिधान केला होता.

Exit mobile version