Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वाभिमानी जयंती उत्सव समितीची बैठक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती १४ एप्रिल रोजी चाळीसगाव येथे साजरी करण्यासाठी नियोजन बैठक नुकतीच आंबेडकर चौक येथे संपन्न झाली.

 

शहरातील सार्वजनिक स्वाभिमानी जयंती कशी साजरी करावयाची यावर चर्चा करण्यात आली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक १४ एप्रिल रोजी सायंकाळी रेल्वे स्टेशन पासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत काढण्यात येणार आहे व 8 वाजेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अन्नदान केले जाणार आहे. 15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून प्रसिद्ध गायक समर्थक शिंदे व रेशमा सोनवणे यांचा भिम गीतांचा जंगी सामना  होणार आहे.

 

13 एप्रिल रोजी समता सैनिक दलातर्फे सकाळी 9 वाजता  केंद्रीय कार्यालय भीमालय रेल्वे स्टेशन जवळ सिंधी कॉलनी चाळीसगाव येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये भिम सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समता सैनिक दल व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी जयंती आयोजकांनी केले आहे.

 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी जयंती उत्सव समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब धर्मभूषण बागुल होते तर विचारमंचावर ज्येष्ठ मार्गदर्शक नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळाचे संचालक महेश चव्हाण, उद्योजक गौतम झाल्टे, गौतम जाधव, देविदास जाधव, मुकेश नेतकर, स्वाभिमानी जयंती उत्सव समितीचे नगरसेवक रोशनभाऊ जाधव, समाजसेवक संभाआप्पा जाधव उपस्थित होते.

 

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सालाबादप्रमाणे मोठया जल्लोषात व 2015 मध्ये समाज बांधवांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बाहेरून कुणाकडूनही वर्गणी न घेता समाज बांधवांकडून वर्गणी घेऊन स्वाभिमानी जयंती साजरी करण्याचे ठरले. व मागील वर्षीचा हिशोब आयोजकांनी मांडला उपस्थितांनी त्याला अनुमोदन दिले. बैठकीस बबलू जाधव, पत्रकार सूर्यकांत कदम, प्रभाकर पारवे, विजय जाधव, शरद जाधव, दिनेश मोरे, राहुल सोनवणे, प्रवीण जाधव, किरण मोरे, मनोज जाधव, स्वप्नील जाधव, शिवाजी जाधव आदी भिम सैनिक उपस्थित होते.

Exit mobile version