Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वाती कुलकर्णी यांना जिजाऊ कन्या पुरस्कार जाहीर

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील खामगाव येथील नॅशनल शाळेच्या शिक्षिका व गृहलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच पोलीस विभागाच्या महिला दक्षता समिती अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांना महिला दिनीनिमित्त जिजाऊ कन्या पुरस्कार जाहीर करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्यात महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या विशेष कार्याबद्धल स्वाती कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वाती ह्या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळून देण्यासाठी कार्यरत असून गेल्या 27 वर्षापासून ते शिक्षण देण्यासोबत महिला जागृतीचे कार्य करीत आहेत. सहज योगाच्या माध्यमातून मानवी जीवनाला चालना देण्याचे भरीव कार्य त्याकरीत असून अनेक लोकांना यासाठी मार्गदर्शन लाभावे म्हणून स्वाती कुलकर्णी ह्या आचार्य बालसंस्कार केंद्र व सहजयोग ध्यान केंद्राचे माध्यमातून त्या जनजागृती उपक्रम राबवित आहेत. या त्यांच्या भरीव कार्याबद्धल राज्यात महिलांसाठी केलेल्या सामाजिक तथा विविध महिला सन्माना विषयक कार्याची दखल घेऊन स्वाती कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी गजानन कुलकर्णी यांच्या स्वाती यांच्या पत्नी आहे. शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेबांचा जिल्हा असलेल्या मातृतीर्थ बुलढाणातर्फे जिल्ह्यात महिला दिनाच्या पर्वावर त्यांना जिजाऊ कन्या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

Exit mobile version