Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जि. प. अध्यक्षांनी दिली आदिवासी भागास भेट

जळगाव, प्रतिनिधी  । जि.प.अध्यक्षा ना रंजना पाटील यांच्या हस्ते  जि.प.विद्यानिकेतन व  जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकिय इमारतीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर  त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांत ध्वजारोहणासाठी उपस्थिती दिली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी चोपडा व यावल क्षेत्रातील आदिवासी भागांना भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या.    

 

ना. रंजना पाटील यांनी चोपडा व यावल तालुक्यांत स्वांतत्र दिनाचे औचित्य साधून भेटी दिल्यांत.  चोपडा तालुक्यांतील पंचक या गांवात नवीन प्रा.आ.उपकेंद्राचे भुमिपूजन ना.रंजना पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री.पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राकेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील,जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि.प.सदस्य शांताराम आबा पाटील,माजी जि.प.सदस्या इंदिराताई पाटील. त्याचप्रमाणे सदर गटातील विद्यमान जि.प.सदस्य तसेच माजी आरोग्य सभापती दिलीप युवराज पाटील तसेच चद्रशेखर युवराज पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार इ.उपस्थितीत होते. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत वड्री तसेच सांगवी खु. ता.यावल या ग्रामपचायतीस भेट दिली.  यावल तालुक्यातील आशावारी  या आदिवाशी वस्तीच्या पाड्यास भेट दिली. याठिकाणी आकाश जबानसिंग पावरा या ८ महिन्याचे बाळाचे कृपोषणाने मृत्यु पावलेल्या परिवारास भेट दिली. या  गावातील अडीअडणी जाणून घेतल्या. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच तालुका आरोग्य अधिकारी, त्यांच प्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार यांना आरोग्य कॅम्प लावण्याच्या सूचना केल्यात.  आदिवासी पाडयाचे सर्वेक्षण करण्यांचे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत. ना.रंजना पाटील यांचे सोबत जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, सदर गटाच्या जि.प.सदस्या सविता अतुल भालेराव, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ..ब-हाटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामपंचायत विस्तार अधिकारी .एच.एन तडवी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

 

 

Exit mobile version