Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्य चौकातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकातून एकाची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, विलास मधुकर चौधरी (वय-५५) रा. डोंगर कठोरा त. यावल जि.जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते दुचाकी (एमएच १९ सीएच ५७८९) ने जळगावात आले होते. शहरातील स्वातंत्र्य चौकातील बाल न्यायालयाच्या समोर गेट जवळ दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कोठेही आढळून आली नाही. शनिवारी ९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.

 

Exit mobile version