Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्य चौकातून एकाची दुचाकी लांबविली; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेल्या डॉमिनोज पिझ्झा येथील शाखा व्यवस्थापकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ३ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अर्जुन गोपाल अग्रवाल (वय-२६) रा. शनी मंदिर परिसर, कांचननगर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अर्जून अग्रवाल हे स्वातंत्र्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १९ एवाय ६०८) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले. याप्रकरणी अर्जून अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याचा विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक युनुस तडवी करत आहे.

Exit mobile version