Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तरसोद शाळेत वृक्षारोपण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांचे वडील  कै. मुख्याध्यापक सुपडू सुतार यांचे स्मरणार्थ  तरसोद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने जि.प.शाळा तरसोद येथे विजय लुल्हे यांचे वडील मुख्याध्यापक कै. सुपडू सुतार यांच्या  स्मरणार्थ शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील असून प्रमुख अतिथी रविंद्र रंधे, महेंद्र सोनवणे, निवृत्ती खडके,मनोहर बाविस्कर आदी उपस्थित होते.  शालेय परिसरात विजय लुल्हे यांच्या हस्ते पिंपळ, निंब प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, निवृत्ती खडके, मनोहर बाविस्कर, कल्पना तरवटे यांच्या हस्ते विविध फुलझाडांचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपणापूर्वी सोनाक्षी पवार हीने विद्यार्थ्यांना पर्यावरण प्रतिज्ञा दिली. लुल्हे यांच्या आवाहनानुसार गणेश चोथमल व दिक्षा पवार यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली. वृक्षारोपणासाठी विजय लुल्हे यांनी रोपे उपलब्ध करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कल्पना तरवटे यांनी मानले.

 

Exit mobile version