Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने खेडीढोक शाळेस महामानवांच्या चारित्र्यपर पुस्तके भेट

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खेडीढोक जिल्हा परिषद शाळेतील वाचनालयाला खेडीढोक येथील रहिवासी तथा अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी एकनाथ मैराळे यांनी व वंदनाबाई मैराळे यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापुरुषांच्या चारित्र्यपर पुस्तकांची भेट दिली.

 

 

खेडीढोक येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाला महापुरुषांचे जीवन चारित्र्य वाचून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय व्हावी या उद्देशाने एकनाथ मैराळे यांनी व वंदनाबाई मैराळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने महापुरुषांची चारित्र्यपर पुस्तके भेट दिलीत. यात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्य सैनिक लीलाताई, महात्मा फुले यांचे गुलामगिरी व शेतकऱ्यांचे आडूस यांसह इतर पुस्तकांच्या प्रति भेट दिल्या आहेत.याप्रसंगी ग्रामसेवक मनीषा भामरे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग पाटील, राजू पाटील, दिवानसिंग पाटील, वेणूबाई नाईक, माजी सरपंच वसंत पाटील, प्रतिभा पाटील, शोभाबाई मैराळे, पोलीस पाटील उशाबाई पाटील, छायाबाई पाटील,  शाळेतील शिक्षक रामेश्वर भदाणे, नितीन पाटील, ग्रामस्थ शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते

 

Exit mobile version