Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार आज प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली काढण्यात आली.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त   शहरात महानगरपालिका आरोग्य विभाग , अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी यांनी संयुक्तीकरित्या प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली काढण्यात आली. या  रॅलीमध्ये प्लास्टिक विक्रेता असोसिएशन व एकता पतसंस्था तर्फे ८०० कापडी पिशव्या व ५०० चिनी मातीचे कपचे वितरण करून प्लास्टिक कॅरीबॅग बंदी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ही  रॅली आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,  सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे व प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे कमल शामनानी यांनी आयोजित केली.  या  रॅलीमध्ये मनपाचे  मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, नंदू साळुंखे, एल. बी. धांडे, नागेश लोखंडे, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, सर्व आरोग्य निरीक्षक युनिट प्रमुख व सर्व मुकादम इतर कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Exit mobile version