Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करू या – पालकमंत्री गुलाबराव पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । देशभरात स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जागर यात्रा फिरणार आहे. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व जागर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला

 

 

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने भारत सरकारच्या महिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरा जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात  दि. २३ ते २९   ऑगस्ट   ही जागर यात्रा फिरणार आहे.  आगामी वर्षात  या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही, त्यामुळे कोविडचे सर्व नियमाचे पालन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करू या असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या जागर यात्रेस शुभेच्छा दिल्या व जागर रथ शासकीय विश्रामगृहात येथे येऊन पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रदिप पवार आदि मान्यवर उपस्थित होते.  

दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था चे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्या कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जागर करण्यात येणार आहे.  देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.  

 

कलापथक प्रमुख विनोद ढगे यांच्या सह सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, आवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील आकाश धनगर, अनिल बाविस्कर विलास पाटील आदि कलावंत सहभागी झाले आहे.  क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो चे अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार आहे कोविड चे नियम पाळून  स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकारचे  क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांनी केले आहे.

 

 

Exit mobile version