Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वस्त धान्य दुकानात चालतोय जुगार अड्डा; दुकानाचा परवाना रद्दची मागणी

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवपिंप्री येथील स्वस्त धान्य दुकाना बेकायदेशीरपणे जुगाराचा अड्डा बनला आहे. संबंधित विभागाने त्वरीत कारवाई करत दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवपिंप्री येथील स्वस्त धान्य दुकानात राजरोसपणे जुगाराचा अड्डा चालवला जात असुन.अशा या प्रकारामुळे गावातील सुज्ञ नागरिक विचार तर करत आहेतच पण स्वस्त धान्य दुकानालाच जुगाराचा अड्डा बनविला जात आहे. ही शरणमेची बाब आहे.

याविषयी काही नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे यांच्याजवळ स्वस्त धान्य दुकानात चालु असलेल्या जुगार खेळण्याचे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध करून दिले. त्यावरून संदीप हिवाळे यांनी लेखी तक्रारी निवेदन तहसीलदार शेवाळे यांना देवुन संबधीत दुकानदार लताबाई निकम हे स्वस्त धान्य दुकानाच्या नावावर जुगार सारख्या अवैध धंदा चालवत असुन त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द का करण्यात येवु नये अशी तक्रार केली आहे.यावेळी किशोर पाटील,प्रल्हाद बोरसे, जितेश पाटील आदि हजर होते. संबधीत दुकानदार यांना राजकीय पाठबळ असल्याचे हिवाळे यांनी निवेदनात नमुद केले आहे. यांचे विरूद्ध कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version