Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वराज्य गृपच्या रक्तदान शिबिराची तप पूर्ती – आ. गिरीश महाजन यांनी केले कौतुक (व्हिडिओ)

जामनेर भानुदास चव्हाण  | तालुक्यातील पाळधी येथे स्वराज्य ग्रुप च्या वतीने प्रजासत्ताक दिनी स्व. भैय्या पाटील स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात १७५ दात्यांनी रक्तदान करत रक्तदानाचा हा कुंभ उत्साहात पार पडला.

 

गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक जाण व भान असलेल्या उपक्रमातून आजपर्यंत २००० पेक्षा जास्त रक्तपिशव्यांचे संकलन झालेले आहे. असंख्य रुग्णांना याचा लाभ झाला आहे. या शिबिरास आ. गिरीश महाजन यांनी भेट देवून या शिबिराचे कौतुक करत सर्व तरुणांना शाबासकीची थाप दिली. या शिबिरास आ. गिरीश महाजन, मा सभापती तथा उपसरपंच पाळधी नीता पाटील, नगरसेवक जयेश पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, मा सरपंच सोपान सोनवणे , डिगंबर माळी , ग्रा प सदस्य संदीप सुशिर, दीपक माळी, देवचंद परदेशी ,अमित पाटील, मस्तान तडवी, सुमन माळी, मनोज नेवे, नाना सुशिर, डॉ. योगेश माळी, डॉ. जितेंद्र पाटील, दिनेश परदेशी, गजानन परदेशी, कैलास परदेशी, परफेक्ट टेलर, जयंत शेठ शिंपी, हभप ईश्वर महाराज ,श्रीराम माळी ,नाना माळी, दिलीप माळी , प्रत्रकार विनोद कोळी, भानुदास चव्हाण , ईश्वर चोरडिया ,सुप्रीम कॉन्ट्रॅक्टर श्री. मोरे ,मुन्ना चौबे , भगवान खंडाळकर , भराडी येथील पद्माकर पाटील, नाचनखेडा उपसरपंच आबेद पटेल, श्रीकांत पाटील, तुषार पाटील , राम पाटील , निलेश पाटील सर, पहुर क उपसरपंच राजू जाधव , वासू घोंगडे , चेतन रोकडे , भारत भडांगे , जसवंत परदेशी आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विनोद पाटील, किरण पाटील, योगेश पाटील, शुभम पाटील, समाधान पाटील, अण्णा माळी, अजय राजपूत , उमेश माळी , भारत कुंभार , अतुल बाविस्कर , किरण बाविस्कर, आकाश पाटील , दीपक धंदर, राजू माळी, राजू खडके, गोलू पाटील, विनोद ढोले, दीपक पाटील, शुभम चौधरी, हर्षल पाटील, गौरव पाटील, निलेश माळी, स्वराज्य ग्रुप सर्व सदस्य व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version