स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्न करा- डॉ. विद्या गायकवाड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  माणसाने नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत पण नुसती स्वप्ने न पाहता ती सत्यात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले. जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनच्या करिअर समुपदेशन पंधरवाड्यास प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 

नुकतेच दहावी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्यांसाठी दर्जी फाऊंडेशनतर्फे करिअर समुपदेशन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारताच्या पहिल्या ख्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

 

यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह प्रा. गोपाल दर्जी, सौ. ज्योती दज्जी व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्याथ्थ्यांशी संवाद साधतांना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड ह्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी बघावयला पाहिजेत, पदवी शिक्षणासोबतच एक प्रशासकीय करियरची तयारी करावयास पाहीजे. अर्थात कमी वयात सुरक्षित नोकरी किंवा सुजाण नागरीक म्हणून देखील ते घडू शकतात. सध्या दुहावी बारावीची परीक्षा काहींचे पेपर संपत आलेले आहेत परंत् पुढची दिशा काय? हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उभा असतो. कोणते शिक्षण प्रभावी ठरुन भावी आायुष्य सुखकर होईल यासाठी पालक संभ्रमात आहेत.हा संभ्रम दर व्हावा यासाठी दर्जी फाऊंडेशनतर्फ करिअर समूपदेशन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांना करिअरविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ३ या कालावधीत प्रा. गोपाल दर्जी हे विद्यार्थी आणि पालकांना व्यक्तीशः निःशुल्क मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्जी फाऊंडेशन परीवारातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Protected Content