Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थायीत रस्त्यांवरील खड्डे गाजले (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । महापालकेच्या ऑनलाईन महासभेनंतर आज ऑनलाईन स्थायी समितीची सभा अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत रस्तावरील खड्डे, शिवजी नगर पूल, कोंडवाडा व कोविड सेंटरची स्वच्छता व जेवणा पुरविणारा मक्तेदार यावर जोरदार चर्चा झाली. १९ विषय मंजूर करण्यात आले.

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक व नगरसेवक त्रस्त झाले आहेत. या विषयांवर स्थायी सभेत जोरदार चर्चा झाली. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जी व्यवस्था केली आहे ती तोकडी असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ८० टक्के रस्ता चांगला असला की तो दुरुस्त करता येतो. मात्र, शहरातील रस्ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त खराब असल्याने ते दुरुस्त केले तर ठिगळ लावल्यासारखे होईल असा आरोप करत प्रशासनाने नव्याने रस्ता तयार करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असा सल्ला शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिला. यावेळी सभापती अॅड. हाडा यांनी प्रशासनाने वाढीव प्रस्ताव सभेपुढे ठेवावा अशी सूचना यावेळी करण्यात आली.

मागील दोन वर्षांपासून शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. मात्र, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने शिवाजी नगरातील नागरिक जीव मुठीत घेऊन तहसील कार्यालया शेजारील रेल्वे रुळाचा वापर करत आहेत. यात शिवाजी नगर उड्डाण पूल बनवा यासाठी महापालिकेचे पुढाकार घ्यावा अशी मागणी सदस्यांनी केली असता आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

कोंडवाडा संदर्भात प्रशासनाने राबविलेली निविदा प्रक्रीया ही योग्य नसल्याचा आक्षेप सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला. सत्ताधाऱ्यांची ही भूमिका संयुक्तीक नसल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. तर विषयांवर तांत्रिक अडचण आल्याने तो पुन्हा महासभेकडे पाठविण्यात आला असल्याचे सभापती हाडा यांनी सांगितले. . रॅपिड अँटीजेन किट खरेदीचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला.दरम्यान, आवश्यकता भासल्यास प्रशासनाने रॅपिड अँटीजेन किट खरेदी करावे व कार्योत्तर मंजूरी घ्यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. कोविड सेंटरची स्वच्छतेसाठी कामगार पुरवठा व जेवणाचा मक्तेदार याबाबतचे निर्णय घेण्यात आले. तसेच प्रशासन विश्वासात घेत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त केली. नगरसेवक हा २० -२२ हजार नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असतो. मात्र, प्रशासन त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचं आरोप सभागृहात करण्यात आला. सभापती अॅड. हाडा यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसी समन्वय ठेवून काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version