Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नवी दिल्ली -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात सुप्रीम कोर्टाने पुढील महिन्यात तारीख दिल्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा फैसला झाल्यानंतरच निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आजही निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रित मुद्दे मांडणी करण्यास सांगितली आहे. आता पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे.

आगामी सुनावणीत सूचनेनुसार मुद्दे मांडले गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. अन्यथा निवडणुका लांबणीवर जातील असे आजचे चित्र आहे. तूर्तास तात्काळ निवडणुका न होत्या त्या उन्हाळ्यातच होणार असल्याचे उघड झाले आहे.

Exit mobile version