Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षणमंत्री झाली, पण सुरक्षित झाली नाही: : पंकजा मुंडे

maharashtra bjp leader pankaja munde file pic 1575197466

बीड (वृत्तसंस्था) हिंगणघाटची घटना मनाचा थरकाप उडवणारी आहे. सुन्न आणि अपराधी वाटतंय. इतक्या शतकांमध्ये आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वत:चं कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रीला संरक्षण देऊ शकलो नाही, अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

नागपूरमधील ‘ऑरेंज सिटी’ रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. त्यांनतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हिंगणघाटची घटना मनाचा थरकाप उडवणारी आहे. सुन्न आणि अपराधी वाटतंय. इतक्या शतकांमध्ये आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वत:चं कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रीला संरक्षण देऊ शकलो नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘पीडित तरुणीच्या कुटुंबाचे दु:ख कल्पनेच्या पलीकडचे आहे. ते कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या अशा क्रूर अहंकारी गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत देहदंडाची शिक्षाच दिली पाहिजे,’ असा संताप पंकजांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version