Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्तुत्य उपक्रम: जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गरिबांना मिठाई, फराळाचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष दीपिका भामरे यांच्यातर्फे दिवाळी निमित्त जळगावात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब बालकांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले व युवती महानगराध्यक्ष आरोही नेवे उपस्थित होत्या.

 

गेल्या दोन वर्षापासून कोव्हिडमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यात जे गरीब कुटुंब आहेत त्यांना अजूनही हवा तसा रोजगार मिळालेला नाही. ऐन दिवाळीत काम नसल्याने दिवाळी कशी साजरी करणार हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. मात्र दीपिका भामरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान बालकांना दिवाळीचे फराळ व मिठाईचे वाटप करत एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , खा. सुप्रिया सुळे हे नेहमी सांगतात की, आपल्याला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करायचे आहे. त्यांच्या ह्या शिकवणीतून हा स्तुत्य उपक्रम राबविला असून असे अनेक उप्रकम पुढे देखील राबविणार असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष दीपिका भामरे यांनी बोलताना दिली आहे.

Exit mobile version