Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टेडियम नामांतर मागे घेण्याची भाजप खासदाराचीच मागणी !

अहमदाबाद : वृत्तसंस्था । मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे.आता भाजपाला घरचा आहेर मिळाला आहे.भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुजरात सरकारकडे स्टेडियमला दिलेलं पंतप्रधान मोदींच नाव मागे घेण्याची मागणी केली आहे.

“गुजरातचा जावाई या नात्याने राज्यातील अनेकांनी मला स्टेडियमवरून सरदार पटेल याचं नाव हटवण्यात आल्याबाबत विचारणा केली. माझा सल्ला आहे की गुजरात सरकारने आपली चूक सुधारत नरेंद्र मोदी याचं नाव मागे घ्यायला हवं. त्यांनी असं करताना सांगायला हवं की नाव बदलताना नरेंद्र मोदींचा सल्ला घेतला नव्हता, त्यामुळे हे परत घेत आहोत. असं भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम हे सरदार पटेल स्पोटर्स एनक्लेव्हमध्ये असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती हे एनक्लेव्ह उभे राहणार आहे. त्यात अन्य क्रीडा प्रकारांसाठी सुद्धा सुविधा असतील.

स्टेडियमला मोदींचे नाव देण्याच्या निर्णयावर टीका करताना काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला आहे. “भाजपाच्या मातृ संघटनेवर बहिष्कार घालणाऱ्या गृहमंत्र्यांच्या नावाने हे स्टेडियम असल्याचे आता त्यांच्या लक्षात आले असावे, किंवा ट्रम्प यांच्याप्रमाणे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे इथे आदिरातिथ्य करण्यासाठी ही अ‍ॅडव्हान्स बुकिंग असावी” असे खासदार शशी थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version