Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सौखेडासीम येथील अंगणवाडीच्या कामाची चौकशी करा

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील सौखेडासिम येथे जिल्हा परिषदच्या दहा लाख रुपयांच्या निधीतुन अत्यंत निकृष्ठ अंगनवाडीचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवुन कामाची चौकशी करावी अशी मागणी सुनिल भालेराव यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास यांच्याकडे केली आहे.

सुनिल भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदरचे आंगणवाडी बांधकामासाठीच्या गढयांची खोलाई केलेली नसुन जमीन लेव्हला पिसिसी केलेली नाही. शासनाने नमुद केलेल्या अंदाजपत्रका प्रमाणे बांधकामात विटा आणी सिमेन्ट वापरण्यात आलेल्या नाही यामुळे बांधण्यात येत असलेली आंगणवाडीची खोली ही १० लाख रुपये निधीतुन बांधण्यात आलेली खोली ही निव्वळ ३ते ४ लाख रुपया पर्यंत करण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.शासनाच्या १० लाख रुपयांच्या मंजुर निधीच्या अर्ध्याच पैशातुन बांधण्यात येत असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट प्रतिचे होत असुन, भविष्यात ही खोली कोसळल्यास या ठीकाणी मोठया प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या बाबींची दखल घेऊन यावल पंचायत समितीच्या वतीने तात्काळ हे बांधण्यात आलेले अंगणवाडी खोलीचे बांधलेले बांधकाम पाडण्यात येवुन त्या ठिकाणी नव्याने त्याच ठेकेदाराकडुन शासनाच्या निविदा व अंदाजपत्राका प्रमाणे बांधण्यात यावे अशी मागणी सुनिल भालेराव यांनी केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा ईशारा ही सुनिल भालेराव यांनी दिला आहे.

दरम्यान जिल्हा परिषदच्या बांधकाम विभाग उप अभीयंता यांनी दिनांक १५ सप्टेंबर रोजी या कामाचे मुळ ठेकेदार यांना ग्रामपंचायत सौखेडासिमच्या ठरावानुसार संबंधीत अंगणवाडीचे निकृट होत असल्याचे ठराव घेतल्याच्या अनुषंगाने या बाबीचे निरसन होत नाही तो पर्यंत बांधकाम बंद ठेवण्याची नोटीस पाठविण्यात आल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

Exit mobile version