Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोशल मीडियावर तरूणीची बदनामी; ११ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । उसवारीने घेतलेले पैसे परत मागितल्याने २५ वर्षीय तरूणीची फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरूणीने दिलेल्या फियादीत म्हटले आहे की, फेसबुकवर श्याम भानूदास पाटील नावाचा तरूणीचा मित्र आहे. त्याने मैत्रीच्या संबंधातून तरूणीकडून ४ हजार ९०० रूपये उसनवारीने घेतले होते. त्यातील २ हजार रूपये तरूणीला परत केले. उर्वरित २ हजार ९०० रूपये मागितले असता तरूणाने फेसबुक व व्हॉटस्ॲपवर खंडणीखोर असे म्हणून बदनामी करण्यास सुरूवात केली. त्या पोस्टला प्रतिसाद देत श्याम पाटीलच्या मित्रांनी देखील खंडणीखोर समाजसेविका असे कमेंट टाकू लागले. तसेच एका मुलीने स्वत: फेसबुक लाईव्ह करून तिच्या प्रियकराचा फोटो टाकून संसार मोडला व १० हजार रूपयाची घेतले असे सांगून तरूणीची बदनामी केली. हा सर्व प्रकार ५ जुलै ते १२ जुलै २०२० दरम्यान घडलेला आहे. तरूणीच्या फिर्यादीवरून श्याम भानुदास पाटील रा. फैजपूर ता.यावल, स्नेहल सोनी रा. मुंबई, प्रथमेश कांबळे रा. मुंबई, सिमा गायकवाड रा. तांबे, अजय जाधव, करूणा सोनवणे, प्रज्ञा तांबे, राहूल भालेराव, कोमल पगारे, संदीप आराख आणि कांचन बनसोडे (पुर्ण नाव माहिती नाही) या ११ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version