Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोशल मीडियावर आनंद सागर सुरू झाल्याची चर्चा…!

शेगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता भक्तांची गर्दी नेहमीच असते. येथे आल्यावर श्रींच्या दर्शनानंतर भक्तगण आनंद सागर येथे जात असे. श्री संत गजानन महाराज संस्थान कडून 2001 साली धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकर व उभारणी करण्यात आली होती.

 

शेगावतील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येत असे. यामुळे येथे पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थांनी आनंद सागर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता .मात्र मागील दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि आज पुन्हा एकदा माध्यमांमध्ये याची चर्चा समोर आल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे .की पुन्हा एकदा आनंद सागर सुरू होणार की काय ? याकरता अनेक जण याची माहिती जाणून घेण्याकरता उत्सुक आहे.

 

गजानन महाराज संस्थान हे नेहमी आपलं शिस्तबद्ध आणि प्रसिद्धी पासून दूर असलेले एकमेव संस्थान म्हणावं लागेल. फक्त भाविकांची सेवा हीच एक व्रत घेऊन संस्थान सदैव कार्यरत असते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या चांगल्या पद्धतीने कसं नियोजन करण्यात येईल यावर संस्थांचा नेहमी भर असतो. मागील दोन दिवसापासून आनंद सागर बाबत ज्या चर्चांना उधाण आल्या आहे याबाबत सध्यातरी संस्थांच्या वतीने नेहमीप्रमाणे त्यांच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने कोणत्याही उपक्रमाची किंवा जशी उत्सवाची माहिती देण्यात येते .तसे आनंद सागर सुरू होणार ,केव्हा होणार आणि कसा होणार याबाबत अद्यापही काही अधिकृतपणे सांगण्यात आलं नाही आहे . त्यामुळे तरी फक्त या सोशल मीडियातल्या आणि माध्यमांमधल्याच चर्चा समोर येत आहे .पण एकंदरी शेगावला आल्यानंतर पुन्हा एकदा आनंद सागर ला भेट देण्याचे लवकरच भावी भक्तांना योग योग हे अनेकांच्या मनातलं अंतरमन  म्हणत असते .कारण ज्या पद्धतीने शेगाव संस्थान आपल्या प्रत्येक कार्यात शिस्त पाळते .तसेच जागतिक स्तराच्या नावलौकिक प्राप्त आनंद सागर प्रकल्पांमध्ये देखील तशीच आनंद मिळत होता अशी  भक्तांच्या भावना आहेत .त्यामुळे नेमकं आता येणाऱ्या काळामध्ये भाविकांना आनंद सागर बाबत अधिकृत गोड बातमी केव्हा मिळते .याकरता अजून तरी काही वेळ वाट पाहावी लागेल असं म्हणायला हरकत नाही.

Exit mobile version