सोशल मीडियामध्ये लॉकडाउनचा मेसेज फॉरवर्ड करणे पडेल महागात ; पोलीस ठेवणार नजर

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात लॉकडाउन होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात फॉरवर्ड करून अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलला नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात  असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं  व संभ्रमाचे वातावरण तयार  होतं आहे.  यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता  वर्तवली जात असतानाच दुसरीकडे लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.  व्हॉट्सअपसह सोशल मीडियातून लॉकडाउन लागू होणार असल्याच्या आणि लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्याचा जात आहे.  लॉकडाउनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर अनेक गैरसमजही पसरत असून, राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. राज्यातील अनेक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं संचारबंदी आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियावर राज्यातच लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

 

Protected Content