Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परवानाधारक व्यक्तीलाच मद्य विक्री करावी

भुसावळ (संतोष शेलोडे)। जिल्ह्यात मंगळवारपासून मद्य/दारूच्या दुकानांना विक्री करण्याची आयुक्तांसह जिल्ह्याधिकाऱ्यांनी अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूंनी हाहाकार माजविला आहे. भुसावळात दारू खरेदी करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पायमल्ली केली जात आहे. एक प्रकारे शासनाची फसवणूक केली जात आहे. शासनाने दारू पिणारे परवानाधारकांनाच दारू द्यावी सोबत बिलही देण्यात यावे.

लॉकडाउनमुळे मद्य विक्री बंद ठेवण्यात आली होती. पण दारू पिणाऱ्यांचा संयम संपल्याने व शासनाचा महसूल बुडत असल्याने त्यांच्या खाली झालेल्या तिजोऱ्या पुन्हा भरण्यासाठी त्यांनी अटी शर्तीवर ५ मे पासून जिल्ह्यात मद्य/दारू परवानाधारकांना सील बंद बाटली विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ६ मीटर अंतर ठेवणे, सॅनिटायझर करणे, प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टनसींग ठेवणे, काउंटरवर ३ व्यक्ती ठेवणे अशा सूचना भुसावळातील राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षकांनी यांनी दिल्या.

कोरोनामुळे एकीकडे महामारी सुरू आहे. दुसरीकडे दारू खरेदी करण्याऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहे. प्रशासनाने दारू पिणाऱ्या परवाना धरकांना दारू विक्री करावी व दोबत दारू परवानाधारकांना बिल ही देण्याची तरतूद केल्यास प्रशासनाचा महसूल बुडणार नाही व दारू विक्रीच्या आड नकली मालाची विक्री होणार नाही. ज्याप्रमाणे रेशन घेण्यासाठी आधारकार्डची सक्ती केली त्याचप्रमाणे दारू खरेदी करतांना फार्म भरून दारूची विक्री व्हायला पाहिजे. आधार नसल्यास धान्य लाभार्थी वंचित राहिला जातो. असा नियम दारू विक्रेत्यांनाही लागू करा. म्हणजे महसुल चांगला मिळेल.

Exit mobile version