Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोलापुरात जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार !

सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापुरात जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नराधम बाप अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करत असल्याची फिर्याद पीडित चिमुरडीच्या आईनेच पोलिसात दिलीय.

 

गेल्या दोन वर्षांपासून आपला पती आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 19 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास घरी कोणी नव्हते. मुलगी झोपल्यानंतर पतीने तिला उठवून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन नराधम पित्याने दोन वर्षांपासून मुलीवर अत्याचार केले, असा आरोपही फिर्यादीत केला आहे.

Exit mobile version