Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोलापुरातील एमआयएमचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत

सोलापूर । येथील महापालिकेत असणारे एमआयएमचे सर्वच्या सर्व १० नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सभागृह नेते तौफिक शेख यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून शून्य होणार आहे.

Exit mobile version