सोलर प्रकल्प जमीन खरेदीची होणार चौकशी; आंदोलन तूर्त स्थगित

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारातील जमीनी विकत घेतांना सोलर कंपनीने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्र्यांनी दिल्यामुळे या संदर्भात मुंबईत सुरू असलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे – शिवापूर शिवारातील शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करून सोलार कंपनीने शेतकर्‍यांवर अक्षरशः अन्याय केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकर्‍यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहेत. दरम्यान न्याय मिळण्यासाठी शेतकर्‍यांना खूप झटावे लागत आहे. यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव कृती समितीने मोजक्या शेतकर्‍यांना सोबत घेऊन मुंबई येथील आझाद मैदानावर २१ सप्टेंबर रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.

संबंधीत आंदोलन हे भर पाऊसात सुरु असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून होते. एकूण अठरा दिवस आंदोलन सुरू असतांनाच अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी शनिवार रोजीच्या १८ व्या दिवशी लेखी आश्वासनाचे पत्र घेण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळ गेले होते. याप्रसंगी सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक चौकशी होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल असे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहेत असे सांगून; आपण हे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. यानुसार आंदोलनकर्त्यांनी तात्पुरती आंदोलनाला स्थगिती दिली आहे. मात्र येत्या दहा,बारा दिवसांत चौकशीअंती निर्णय शेतकर्‍यांच्या बाजूने लागले नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीने दिला आहे.

तत्पूर्वी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी समितीचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ जाधव , प्राणी मित्र इंदल चव्हाण, कांतिलाल राठोड, चत्रू राठोड, देवेंद्र डी. नायक आदींचा मोलाचा सहकार्य लाभले. तर कायदेशीर बाबींवर जोरदार युक्तिवाद करून प्रकल्पाचे बेकायदेशीर कारभार शासनाच्या लक्षात आणून देणारे कृती समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे हे अठरा दिवस आंदोलनाला उपस्थित राहीले. यावेळी अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव, उपाध्यक्ष चुनिलाल राठोड, सदस्य मदन राठोड, रघुनाथ राठोड, आदींनी खूप परिश्रम घेतले. आता या प्रकरणी चौकशीतून काय समोर येणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Protected Content