Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोलर पिडीत शेतकर्‍यांसाठी ओंकार जाधव यांचे १ फेब्रुवारी रोजी उपोषण

चाळीसगाव प्रतिनिधी । बोढरे शिवापूर सोलर प्रकल्प पिडीत अन्याग्रस्त शेतकर्‍यांना त्यांचा न्याय हक्क मिळावा, तसेच अन्य मागण्यांसाठी ओंकोर जाधव हे १ फेब्रुवारी रोजी उपोषण करणार आहेत.

बोढरे शिवापूर शिवारात सुमारे १२०० एकर शेतजमिनी बेकायदेशीर गैरमार्गाने कवडी मोल भावात जमिनी बळकावण्यात आली आहे. या प्रकरणी शेतकरी बचाव कृती समिती सोबत पहील्यापासून अन्याग्रस्त शेतकर्यांच्या न्यायासाठी अहोरात्र सोबत झटणारे ओंकार आबा शेतकर्‍यांच्या लढ्यात साथ देत आहेत. विविध संघटनेतील कार्यकर्त्यांनी आज वाढदिवसाच्या तयारी निमीत्त त्यांची घरी जाऊन भेट घेतलीत असता आबांनी खर्चिक वाढदिवस साजरा न करता सोलर पिडीत शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्यासाठी व शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागणीसाठी वाढदिवसाच्या निमीत्ताने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचे सुचवले.

यानुसार तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले,

यात खाली मागण्यांचा समावेश आहे.

१) सोलर कंपन्यांच्या बेकायदेशी गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, व महसुल राज्य मंत्री यांनी दिलेल्या मुदतीत महसुल प्रशासनाने चौकशी अहवाल मंत्री महोदयांकडे पाठवण्यात यावे,
२) सोलर पिडीत शेतकर्‍यांच्याा शेतजमिनीचा योग्य तो एकसमान मोबदला देण्यात यावा.
३) सोलर कंपन्यांनी बेकायदेशीर शेतजमिनीवर अतिक्रमण करून ऊभे केलेल्या टॉवर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
४) भुमीहीन शेतकर्‍यांचे शासन नियमानुसार पुनर्वसन करण्यात यावे.
५) दि ,१५/११/२०१७ रोजी सोलर कंपनीच्या बेकायदेशीर कारभारा बाबत ऐकदिवसीय लाक्षणिक उषोषण छेडण्यात आले होते त्यावेळी निवेदनात दिलेल्या मागण्यांची पुर्तता शासन स्तरावर काय दखल घेण्यात आली त्याविषयी लेखी खुलासा देण्यात यावा.
६) सोलर प्रकरणी शेतकर्यांसह शेतकरी बचाव कृती समितीच्या पदाधिकारींना जिवे ठार मारण्याची धमकी देणार्या कंपणीचे प्रतिनिधी व दलालांवर कारवाई करण्यात यावी.
७) सोलर प्रकरणी मयत अंबिबाई गणेश राठोड या शेतकरी महीलेच्या संशयित मृत्युची सखोल चौकशी होऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्या यात आहेत.

Exit mobile version