Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमय्यांची आता रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज पोलीस स्थानकात रश्मी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी कालच ट्विट करत उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या १९ बंगल्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे नवीन वर्षात काढण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने त्यांनी आज रेवदंडा पोलीस स्थानकात रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यामुळे रश्मी ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे कुटुंबासह अनिल परब आणि गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि अस्लम खान यांच्या नावांचा उल्लेख देखील केलेला आहे. यामुळे आता ते यांच्या विरोधात नेमकी काय भूमिका घेणार याबाबत देखील उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.

Exit mobile version