Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोन्याच्या दरात तब्बल २६०० रुपयांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) सेन्सेक्समधील पडझडीचा परिणाम सोने दरावरही होत आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल २६०० रुपयांनी घसरले.

शेअर बाजारात निर्देशांक ३१०० अंकांनी कोसळल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. तर दुसरीकडे, सोन्याच्या भावातही विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल २ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गुरुवारी सोने १२८ रुपयांनी स्वस्त होऊन त्याचा भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तसेच चांदी ३०२ रुपयांनी स्वस्त होऊन भाव किलोला ४६ हजार ८६८ रुपये झाला होता.

 

Key words : gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold

Exit mobile version