Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोनिया गांधी व मायावतींना भारतरत्नने सन्मानित करा ! : रावत

डेहराडून वृत्तसंस्था । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती या देशातील कर्तबगार महिला राजकारणी असून त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे.

हरिश रावत ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त करताना म्हणाले, “काँग्रेसच्या हंगामी अक्ष्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल. मात्र, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा”

Exit mobile version