Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोनवणे दाम्पत्यांच्या हस्ते गणेश पूजन

जळगाव, प्रतिनिधी । अनंत चतुर्थीच्या पावन पर्वांवर महापौर सौ. भारती सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करून कोरोनाचा काळ संपून सर्वांना पुन्हा यशस्वी उभारी घेण्याचे सामर्थ्य दे अशी प्रार्थना केली

महापौर सौ. भारती कैलास सोनवणे व कैलास सोनवणे यांच्या निवासस्थानी श्री. गणरायाचे आगमन झाले. याप्रसंगी महापौर सौ. सोनवणे यांनी श्री. गणेशाला प्रार्थना केली की, हे गणराया, आजवर तुझ्या कृपादृष्टीने आम्ही आनंदात जगतो आहे. जळगाव शहर आणि देशावर आलेल्या मोठ्या संकटांना दूर करण्याचे सामर्थ्य तू आम्हाला दिले. समाजात असलेल्या सर्व अनिष्ठ प्रवृत्तींना दूर सारत सकारात्मक ऊर्जेचा मोठा झरा आजपासून वाहू दे. देशात असलेल्या कोरोनारुपी राक्षसाला ठार करून पुन्हा हसतखेळत निरोगी आयुष्य आम्हाला लाभू दे. आमच्या जनतेवर आलेले सर्व संकट दूर सारत सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे. सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळू दे. कोरोनाचा काळा काळ संपून सर्वांना पुन्हा यशस्वी उभारी घेण्याचे सामर्थ्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

Exit mobile version