Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे कबूतर आकाशात सोडून स्वातंत्र्य दिन साजरा

जळगाव,प्रतिनिधी । सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे स्वतंत्र दिनानिमित्ताने सर्वधर्मीय युवकांची राष्ट्रीय एकात्मता मोटर सायकल रॅलीचे आयोजन २२ वर्षापासून करण्यात येत असते. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम पळून ही रॅली रद्द करण्यात येऊन शांतीचे प्रतिक कबूतर यांना आकाशात सोडून जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

भारताचा राष्ट्रीय सण भारतीय स्वतंत्रता दिन प्रथमच घरातच घरातल्या सदस्यांसोबत शनिवार १५ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी साडेनऊ वाजता सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे जशने यौमे आझादी ” या कार्यक्रमाचे भिलपुरा येथील सै. अयाज अली नियाज अली यांच्या घरी आयोजन करून  घरातील सदस्यांसोबत उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्य व शांततेचे प्रतीक असलेल्या कबुतरांना हातात घेऊन आकाशात सोडण्यात आले.

सय्यद फरहीन हिने मेरा रंग दे बसंती चोला, ए मेरे वतन के लोगो, व ऐसा देश है मेरा हे गीत सादर केले. याप्रसंगी सर्वांनी राष्ट्रगीत पठण करून स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचे स्मरण केले. तसेच ” जय हिंद जय भारत, जशने यौमे आजादी जिंदाबाद, हम सब एक है, भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ” अश्या घोषणाही देण्यात आल्या. याप्रसंगी शुभेच्छा फलक व तिरंगा राष्ट्रध्वज हवेत फडकवून आनंद व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, सय्यद फरहीन अयाज अली, सय्यद अझका फातेमा अयाज अली, सय्यद तस्बीह सॉलेह, सय्यद अदिबा नाज, सय्यद अता ए मुहम्मद अली, सय्यद झिशान अली रियाझ अली, सय्यद मारिया कशफ रियाझ अली, सय्यद मुहम्मद अली रियाझ अली, सय्यद ओवेश अली, राना अफशा इ. उपस्थित होते.

Exit mobile version