Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

मोटरसायकल तिरंगा रॅलीचा शुभारंभ सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून भिलपुरा  चौकातून करण्यात आली.  पुढे  घाणेकर चौक, टावर चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक,  पांडे चौक सुभाष चौक व परत भिलपुरा चौकात येऊन समाप्त झाली.  याप्रसंगी  जशने यौमे आजादी जिंदाबाद,  भारतीय स्वतंत्रता दिवस चिरायू होवो,  हम सब एक है,  जय हिंद जय भारत अशा घोषणाही देण्यात अशा घोषणाही देण्यात आल्या.  सदर रॅलीच्या अग्रभागी भारत मातेची वेशभूषा केलेली एक लहान मुलगी शाहे झमन दानिश ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.  रॅलीत  सर्वांच्या हातात राष्ट्रीय ध्वज तिरंगा होता.  तसेच छाती वर सुद्धा तिरंग्याचा  बॅच लावलेले होते.

या रॅलीचे नेतृत्व सै. अयाज अली नियाज अली  यांनी केले.  याप्रसंगी हिंदू धर्मगुरु पंडित देवीलाल जी व्यास,  मुस्लिम धर्मगुरू मुजावर बाबा फैय्याज नुरी,  शीख धर्म गुरु ग्यानी गुरुप्रीत सिंग जी,  ख्रिश्चन धर्म गुरु फादर पास्टर सुरेश चंद्रकांत माहुरे,  फारुख शौकत,  सुरज गुप्ता,  योगेश मराठे,  कामिल खान,  सय्यद उमर,  मनोज सेठिया,  अनित मुजुमदार,  सतीश वाणी,  शेख शफी,  काशिफ टेलर,  रवींद्र खैरनार,  अमित गौड,  नाझीम कुरेशी,   नाजीम पेंटर,शेख अब्दुल जुम्मन,  सलमान मेहबूब,  जुबेर रंग्रेज,  नुर  जावेद,  जाफर खान,  शेख आवेश,  संतोष जाधव, जीशान हुसेन,  शोएब याकुब, सय्यद आसिफ,  शेख रफीक,  दानिश हुसैन,  नंदकुमार कासार, असलम नागोरी,  मोहम्मद कैफ,  शेख नजीर उद्दीन,  रागीब वहाब यांसह सर्वधर्मीय लोक उपस्थित होते.  रॅलीची सांगता सामूहिक राष्ट्रगान करून करण्यात आली.

 

Exit mobile version