Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवा सहयोग संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून व सेवा सहयोग संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे सेवा सहयोग फाउंडेशनच्या (पुणे) माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल व गँरेज किटचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून गुणवंतदादा सोनवणे यांनी हे स्तुत्य उपक्रम राबविले. दरम्यान तालुक्यात प्रथमच सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी गँरेज व्यवसायासाठी प्रशिक्षण व गँरेज किटचेही वाटप याप्रसंगी जि. प. प्राथमिक शाळेत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे, महेश चव्हाण, तुषार निरगुडे, विजय पाटील, लोकनायक तात्यासाहेब स्वर्गीय महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्राताई पाटील, सामाजिक वनिकरण विभागाचे अमित पाटील, विरेंद्र राजपुत, ग्रामोदय प्रकल्पाचे समन्वयक राहुल राठोड, दयाराम सोनवणे, पंकज राठोड, योगेश राठोड, मंगेश राठोड, ब्राम्हणशेवगे येथील मा.सरपंच दत्तात्रय पवार, बद्रीनाथ राठोड, रत्नाकर पाटील, ज्ञानेश्वर राठोड, वासूदेव जाधव, वासुदेव नेरकर, सचिन पवार, ग्रामसेवक शैलेश पाटील, केंद्रप्रमुख सावंत,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदिश सुर्यवंशी, शिक्षक वृंद, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदिश पाटील, शिक्षक वृंद,कृषी विभागाचे तुफान खोत, ग्रामस्थ, माध्यमिक व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सहयोग ग्रामोद्य प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक सोमनाथ माळी यांनी तर सुत्रसंचालन वाय.टी.पाटील यांनी केले.

Exit mobile version