Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवानिवृत्त रसायनशास्त्रज्ञ ठोंबरे यांच्या कार्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील रहिवासी असणार्‍या सेवानिवृत्त रसायनशास्त्र डॉ. पुरूषोत्तम ठोंबरे यांच्या कार्याची पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने दखल घेतली आहे.

 

तालुक्यातील  सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा  येथील महा निर्मिती विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ रसायनशास्रज्ञ सेवानिवृत्त कर्मचारी डॉ.पुरुषोत्तम ईच्छाराम ठोंबरे यांनी पतप्रधान कार्यालयात पावसाळ्यात नदीच्या वाया जाणार्‍या पाण्याचा उपयोग करून जमिनीच्या पाण्याची पातळी कशी वाढविता येईलयाबाबत प्रस्ताव सादर केला होता.

 

याची पतप्रधान कार्यालयातून फोनवरुन नुकतीच मुलाखत घेण्यात आली याबाबत आकाशवाणीवर प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.यात त्यांनी नदीच्या पाण्याचा उपयोग करून जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढविता येईल त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल,महापुराचा धोका कसा टाळता येईल आणि शेतकरी बांधवांना पाण्याचा उपयोग शेतीकरिता करता येईल तसेच पुराचे समुद्रात वाहून वाया जाणार्‍या पाण्याचा उपयोग करून घेता येईल याबाबत आपली भूमिका लेखी पत्राद्वारे मांडली होती. पंतप्रधानांची याचा मन की बात या कार्यक्रमात याचा उल्लेख केला.

 

डॉ. ठोंबरे यांच्या या कार्याबद्दल डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार करून त्याचे नुकतेच अभिनदन करण्यात येवुम त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी उपसरपंच धनराज पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.टी.बागडे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन, दिलीप तायडे,आशा आढाळे,शबनम तडवी,शकीला तडवी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version