Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यात मुलाकडे गेलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमती मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण गरबड चौधरी (वय-६९) रा. जुना खेडी रोड, सदाशिव नगर, जळगाव हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहेत. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांचा एक मुलगा हा पुण्यात नोकरीनिमित्त राहतो. १० ऑगस्ट रोजी नारायण चौधरी हे पत्नीसह पुण्याला घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून घर बंदच होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत १० ऑगस्ट ते २४ सप्टेंबर दरम्यान बंद घराच्या दरवाजाचे सेंटर लॉक तोडून घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार चौधरी यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी नारायण चौधरी यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. चौधरी हे पुण्याहून रविवारी २५ सप्टेंबर रोजी जळगावातील राहत्या घरी आले असता त्यांना घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दुपारी ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघूनाथ महाजन करीत आहे.

Exit mobile version