Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवानिवृत्त जवानांवर लॉकडाऊनमध्ये बंदोबस्ताची जबाबदारी

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेला लॉकडाऊन अधिक प्रभावी व्हावा तसेच पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण कमी व्हावा यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस ग्राउंडवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकांना ओळखपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारें, विजयकुमार ठाकूरवाड, पंचायत समिती गटनेते संजय पाटील आदी उपस्थित होते.

देशाच्या सीमा रक्षणासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणारे सैनिक हे देशावर आलेल्या कोरोना सारख्या संकटकाळात निस्वार्थपणे व कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुढे येतात ही निश्‍चितच अभिमानाची बाब असून त्यांचे हे योगदान चाळीसगाव वासीय कायम स्मृतीत ठेवत कृतज्ञ राहू असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये पोलीस अधिकार्‍यास जे अधिकार, कामे व विशेष अधिकार आहेत तेच विशेष पोलीस अधिकारी यांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात असून दिलेल्या जबाबदारी चे शासनाच्या निर्देशानुसार पालन करावे व कुठल्याही प्रकारे अधिकाराचा गैरवापर न होऊ देता आपले कर्तव्य पार पाडावे अश्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी दिल्या.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version