Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे उद्या जेलभरो आंदोलन

 

चोपडा, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील १००चेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने बालविकास प्रकल्प सेवेतून सेवानिवृत्त होऊन सुद्धा तीन वर्षापासून सेवानिवृत्ती लाभ न दिल्याने या वयोवृद्ध सेविका मदतनिसांनी उद्या प्रजासत्ताक दिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

याबाबत सविस्तर असे की, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची वय ६५ वर्षांचे वर असून त्या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना सेवानिवृत्ती लाभ न मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्याच्याकडे आजारपण व उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. या कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्यामुळे सरकारने २०१४ पासून किमान वीस वर्षे सेवेनंतर ६५ वर्षे वयाची सेवेच्या ठरवून सेविकेला एक लाख रुपये तर मदतनीसला ७५ हजार रुपये सेवानिवृत्ती लाभ देण्याचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार गेल्या तीन वर्षापासून जळगाव जिल्ह्यात सेवानिवृत्त झालेल्या शंभरच्यावर सेविका मदतनिसांना सरकारने सेवानिवृत्ती लाभ दिलेला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे अनेकदा पत्रव्यवहार करून नामदार मंत्रीमहोदयांनी जाहीर घोषणा करूनही फक्त कागदोपत्री घोडा नाच वणे चालू आहे म्हणून या वयोवृद्ध सेविका मदतनीस यांचे उद्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यांचे नेते अमृतराव महाजन यांनी दिलेला आहे तरी जळगाव जिल्ह्यातील वयोवृद्ध सेविका मदतनिसांनी सकाळी ११ वाजता प्रजासत्ताक दिन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version