Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेट्रींग काम करणाऱ्या तरूणाने घेतला टोकाचा निर्णय

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु” येथे एका बांधकाम मजुराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हातले येथील सिद्धार्थ सुदाम खैरे (वय – २८) हा तरुण तारखेडा ता. पाचोरा येथे सासरवाडीत सेंट्रींग काम करुन आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान २६ मे रोजी सिद्धार्थ हा घरी एकटा असतांना त्याने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदरचा प्रकार कुटुंबिय व शेजारींच्या लक्षात येताच सिद्धार्थ यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सिद्धार्थ यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्धार्थ खैरे याचे पाश्चात्य वडिल, सावत्र आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार असून अतिशय होतकरु व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या सिद्धार्थ याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Exit mobile version