Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुसाईड बॉम्बर असल्याचे सांगत बँक उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

 

 

 

वर्धा : वृत्तसंस्था । जिल्ह्यातील  बॅंकेत सुसाईड बॉम्बर आहोत असे म्हणत एका व्यक्तीने बॅंकेतील कर्मचाऱ्याला  १५ मिनिटांत ५५ लाख रुपये न दिल्यास स्वतःसोबत बॅंकेला उडवून देऊ अशी धमकी लिहून  पत्र  दिले मात्र पोलिसांनी दाखवलेल्या चपळाईने आरोपीला अटक करण्यात आली

 

वर्ध्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तोंडाला कापड गुंडाळलेली एक व्यक्ती शिरली. त्यानंतर त्याने शिपायाच्या डोक्यावर बंदूक ठेवत  त्याच्या हातात एक पत्र दिलं. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावील उपचारासाठी ५५ लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत आल्यावर बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केला आहे. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलवले तर सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांना पाहून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलं. हा बनावट बॉम्ब बनवण्यासाठी त्या व्यक्तीने डिजीटल वॉच, पीओपी भरलेले प्लास्टिक पाईप यांचा वापर केला होता.

 

आरोपीने पिस्तूल ऑनलाईन मागवले असल्याची माहिती दिली. योगेश कुबडे असं आरोपीचं आहे. योगेशचा सायबर कॅफे असून त्यावरील कर्जाच परतफेड करण्यासाठी नैराश्यातून हा प्रकार केला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

 

Exit mobile version