सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. परंतू कोणीही या प्रकरणाचे राजकारण करू नये. तसेच मुंबई पोलिसांवर आरोप करू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट केले होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरण सोडविण्यास मुंबई पोलिस पूर्णपणे सक्षम आहे. कोणाकडे काही पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांना द्यावी. मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याविरूद्ध कठोर कारवाई निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.

Protected Content